Strongly Discussion is Going On this Hoardings : या होर्डिंग्जची जोरदार चर्चा.

News @ Hoardings... Chandrapur : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी प्रवीण पडवेकर यांनी चंद्रपूर शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्ज लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.येत्या 3,4 महिन्यात विधानसभेची निवडणूक लागणार आहे.अशातच निवडणुक तोंडावर असताना या होर्डिंग जनतेचे लक्ष वेधून घेत आहे.जिल्ह्यात या होर्डिंग्जची जोरदार चर्चे सुरू असून पडवेकर यांनी होर्डिंगमध्ये आमदाराला जाब विचारला आहे.होर्डिंग्जमध्ये आमदाराचे नाव नसले तरी पडवेकर यांचा इशारा कुणाकडे आहे,हे सांगायची गरज नाही.शेवटी ''ये तो पब्लिक है, सब जानती है.'' असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.या होर्डिंग्जमध्ये 'शहरात 200 युनिट वीज मोफत देण्याचे खोटे बोलून 5 वर्ष पुर्ण झाल्या बद्दल भावपूर्ण श्रद्धांजली' असे मजकूर लिहिले आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी चंद्रपूरचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांनी 200 युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन जनतेला दिले होते.जे आजतागायत पुर्ण झाले नाही ? हे मात्र विशेष. 200 युनिट वीज मोफत,या आश्वासनाच्या जोरावर ते प्रचंड मताने निवडून आले होते.मात्र, आता काँग्रेस ने...